डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुणे महापालिकेकडून थकबाकी भरण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस

पुणे महापालिकेकडून २२ कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावण्यात येणार आहे. रुग्णालय प्रशासनानं महापालिकेच्या मिळकत कराची कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याचं म्हटलं आहे. रूग्णालय प्रशासनानं आत्तापर्यंत धर्मादाय कायद्यानुसार सवलत ग्राह्य धरून मिळकत कर भरल्यानं कराची थकबाकी राहात आहे. धर्मादाय कायद्यानुसार मिळकत करामध्ये सवलत द्यावी या मागणीसाठी रूग्णालय प्रशासन २०१७ मध्ये न्यायालयात गेले आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही तसचं न्यायालयानं कर वसुलीला स्थगिती दिलेली नाही. दरम्यान गरोदर महिलेवर वेळेत उपचार न केल्यानं तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे मंगेशकर रूग्णालयाविरुद्ध आंदोलनं सुरू आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा