डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधायक चर्चा होईल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधायक चर्चा होईल, अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज अधिवेशन सुरू होण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतानं संविधान स्वीकारून ७५ वर्षे झाली आहेत हे यंदाचं वैशिष्ट्य असून यासह अनेक कारणांसाठी हे अधिवेशन विशेष असेल, असं ते म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. मतदारांनी सत्ता द्यायला नकार दिलेले मूठभर लोक संसदेत विनाकारण गोंधळ करतात, असं ते म्हणाले.  

संसदेतल्या वेळेचा उपयोग देशाची प्रतिष्ठा जगात वाढवण्यासाठीच  करायला हवा, अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. देशातल्या मतदारांचा संविधानाबद्दलचा विश्वास, लोकशाहीविषयीची वचनबद्धता यांना काही अर्थ आहे, असा संदेश संसदेतून जायला हवा, असं ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा