प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं ‘विकसित भारताच्या दिशेने वाटचाल – केंद्रीय अर्थसंकल्पोत्तर परिषदे’ला संबोधित करणार आहेत. कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीनं या परिषदेचं आयोजन केलं आहे. सरकारच्या दूरदर्शी योजना आणि या प्रवासात उद्योगांची भूमिका याचा आराखडा सादर करण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. उद्योग, सरकार, राजनैतिक अधिकारी, वैचारिक मंच यांच्यासह एक हजारापेक्षा जास्त जण या परिषदेत सहभागी होणार आहेत.
प्रधानमंत्री उद्या ‘विकसित भारताच्या दिशेने वाटचाल-केंद्रीय अर्थसंकल्पोत्तर परिषदे’ला संबोधित करणार
