हवामान बदल हे सध्याचं सर्वात मोठं संकट असून शाश्वत जीवनशैली हा त्यावरचा उपाय आहे. जैन समाज कित्येक शतकांपासून त्याचा अवलंब करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवकार महामंत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते.
नवकार महामंत्र विकसित भारताच्या संकल्पनेशी निगडीत आहे असं सांगून पाणी बचत, वृक्षारोपण, स्वच्छता, स्वदेशी, देशांतर्गत पर्यटन, सेंद्रिय शेती, आरोग्यपूर्ण जीवनशैली, योग, खेळ आणि गरीबांची मदत- असे नवसंकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यासह १०८ देशांतील नागरिकांनी -नवकार महामंत्राचं पठण केलं.