प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वॉशिंग्टन डीसी इथल्या व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातला प्रधानमंत्री मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारी यापुढंही सुरूच राहणार असून ट्रम्प यांनी दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे, असं मत मोदी यांनी व्यक्त केलं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील ट्रम्प यांच्या विजयाबद्दल मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं.
हे युद्धाचं युग नसून प्रश्न मुत्सद्देगिरीनं सोडवले पाहिजेत असं सांगत ट्रम्प यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला. भारत अमेरिकेकडून तेल आणि वायू खरेदी करेल, असंही मोदी यांनी सांगितलं. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितलं की, मोदी हे त्यांचे दीर्घकाळापासूनचे मित्र असून ते महान नेते आहेत.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची काल सांगता; नवीन प्राप्तीकर विधेयकाची लोकसभेत मांडणी