प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन करणार आहेत. सुमारे १२ किलोमीटर लांबीचा सोनमर्ग बोगद्यामुळे लेहला जाण्यासाठी श्रीनगर आणि सोनमर्ग दरम्यान अखंड वाहतूक सुरु रहायला मदत मिळणार आहे. यावेळी प्रधानमंत्री बांधकाम करणाऱ्या कामगारांना भेटतील. यामुळे सोनमर्गमध्ये वर्षभर पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसंच वाहनांचा वेग देखील सरासरी ३० किलोमीटरवरून ७० किलोमीटर प्रति तासापर्यंत वाढणार आहे.
Site Admin | January 12, 2025 7:30 PM | PM Narendra Modi