प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आभासी पद्धतीनं ५१ हजाराहून अधिक युवकांना नियुक्तीपत्रं वितरीत करणार आहेत. देशात ४० ठिकाणी हे रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. विविध केंद्रीय मंत्रालयं आणि विभागांमधे नव्यानं भर्ती झालेले कर्मचारीही या मेळाव्यांमधे सहभागी होणार आहेत.
१४०० हून अधिक इ लर्निंग अभ्यासक्रम असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमधे आवश्यक ती कौशल्य सक्षमपणे विकसित होतील.