सुप्रसिद्ध नर्तक आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक कनक राजू यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पद्मश्री पुरस्कार विजेते कनक राजू यांनी स्वतःचं आयुष्य आपल्या नृत्यप्रकाराला चालना देण्यासाठी समर्पित करून आपला सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी युवकांना प्रशिक्षित केल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
तर, गुस्सादी नृत्य प्रकाराचं जतन करण्यात राजू यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची मोदी यांनी प्रशंसा केली आहे. त्यांचा वारसा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील असं त्यांनी म्हटलं आहे. राजू यांच्या समर्पण आणि उत्कटतेमुळे सांस्कृतिक वारशाचे महत्त्वाचे पैलू त्यांच्या अस्सल स्वरूपात विकसित होऊ शकतील, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं .