डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १११व्या भागात ३० जूनला प्रधानमंत्री साधणार श्रोत्यांशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १११व्या भागात येत्या ३० तारखेला देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांचा ‘मन की बात’चा हा पहिलाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपले विचार आणि सूचना १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकावर तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा मायगव्ह खुल्या मंचावर येत्या २८ जूनपर्यंत कळवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.

‘मन की बात’ कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून आकाशवाणी वृत्त विभागाच्या संकेतस्थळावरून आणि न्यूज ऑन एअर मोबाईल वरून प्रसारित केला जाईल. आकाशवाणी वृत्त विभाग, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यू ट्यूब वाहिन्यांवरून कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा