विकसित भारताच्या निर्मितीच्या दिशेनं पहिलं पाऊल म्हणून गावांचा विकास करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. गुजरातच्या भारवाड समाजाशी संबंधित बावलियाली धाम इथं झालेल्या कार्यक्रमात ते दूरस्थ माध्यमातून बोलत होते.
ग्राम विकासासाठी सामूहिक प्रयत्नांचं महत्त्व अधोरेखित करताना, ‘सबका प्रयास’ ही देशाची सर्वात मोठी शक्ती असल्याचं ते म्हणाले. समाजाचं सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षणाचं महत्व या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. आगामी पिढीने शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनून सुदृढ समाजासाठी योगदान द्यावं, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. भारवाड समाजाची सेवानिष्ठा, निसर्गप्रेम आणि गोरक्षणाप्रती असलेल्या बांधिलकीची त्यांनी प्रशंसा केली.