प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सूरत इथे, दूरस्थ माध्यमातून, ‘जल संचय जन भागीदारी’ या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. सध्या सुरू असलेल्या ‘जल शक्ति अभियानाशी’ हे अभियान संलग्न असणार आहे. या अभियानाद्वारे गुजरात राज्यातील जनता, स्थानिक स्वराज्य संस्था,उद्योगसंस्थाना पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण अर्थात ‘रेन हार्वेस्टींग’ करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा उभारण्यासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाअंतर्गत, गुजरातमध्ये सामुदायिक भागीदारीतून सुमारे २४ हजार ८०० बांधकामं केली जात आहेत. पावसाच्या पाण्याची साठवणूक वाढवण्यासाठी आणि पाण्याची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, ब्रूनेई आणि सिंगापूर देशांच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल मायदेशी परतले.
Site Admin | September 6, 2024 10:14 AM | Gujarat | PM Narendra Modi | ‘Jal Sanchay Jan Bhagidari’ initiative