डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गेल्या काही वर्षांत ८ कोटी नवीन रोजगारनिर्मिती झाल्याने बेरोजगारीबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळालं – प्रधानमंत्री

गेल्या तीन ते चार वर्षांत आठ कोटी नवीन रोजगारनिर्मिती झाली असून त्यामुळे देशात बेरोजगारीबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळालं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल झालेल्या जाहीर कार्यक्रमात या संदर्भातली आकडेवारी आणि आरबीआयच्या अहवालाचा हवाला देत, देशात कौशल्य विकास आणि रोजगाराची गरज आहे आणि सरकार या दिशेने काम करत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

अफवा पसरवणारे गुंतवणुकीचे, पायाभूत सुविधांच्या विकासाचे आणि देशाच्या विकासाचे शत्रू आहेत, असं मोदी म्हणाले. महाराष्ट्राला जगातलं सर्वात मोठं आर्थिक शक्तिस्थान बनवणं आणि मुंबईला जागतिक अर्थव्यवस्थेचं केंद्र बनवणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि आसपासच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे शहराचा जवळच्या भागांशी संपर्क वाढेल, ज्यामुळे महिलांसाठी चांगल्या सुविधा तसंच सुरक्षितता वाढेल या मुद्याकडे मोदींनी लक्ष वेधलं.

 

पालघरमधल्या डहाणू इथं ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदरालाही मंजुरी दिली असून, त्यातून १० लाख रोजगार निर्माण होतील असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा