डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

तरूणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार महत्व देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

तरूणांच्या क्षमता आणि कलागुणांचा पूरेपूर वापर करून या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरूणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित रोजगार मेळाव्याला संबोधित करत होते.  देशभरात ४५ ठिकाणी असे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारख्या विविध मंत्रालयांमध्ये ७१ हजारांहून अधिक नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं. 

 

मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत अभियान, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, डिजिटल इंडियासारख्या योजनाही युवांना केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या रोजगार धोरणांमुळं ग्रामीण भागांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचंही ते यावेळी म्हणाले. तसंच महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नितिन गडकरीं यांनी नागपूरमध्ये आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यामध्ये नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा, विश्वसनीयता आणि पारदर्शकता ही क्षमता आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये नवनियुक्तांनी आपल्या अंगभूत तसेच व्यक्तिगत कौशल्याचा विकास करून केवळ नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरच्या केंद्रीय राखीव पोलीस दल ग्रुप सेंटर हिंगणा येथे आयोजित रोजगार मेळाव्यात केल. यावेळी २५७ जणांना नागपूर मधील रोजगार मेळाव्यात गडकरींच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरित करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा