डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राजस्थान सरकार स्थापनेच्या वर्षपुर्तीनिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ४६,००० कोटी रुपयांच्या विकासकामांची भेट

राजस्थान राज्य सरकार स्थापनेला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जयपूरमधील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ४६ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या उर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणी या क्षेत्रातील २४ प्रकल्प पायाभरणी आणि उद्घटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ते एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि काही केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पांमध्ये पूगलमध्ये २ हजार मेगावॅट क्षमतेचा सौर पार्क आणि १ हजार मेगावॅट क्षमतेच्या सोलर पार्कच्या दोन टप्प्यांचा आणि पिण्याच्या पाण्यासाठीच्या काही प्रकल्पांच्या विकासाची पायाभरणीही प्रधानमंत्री करणार आहेत.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा