डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अर्थसंकल्पानंतरच्या तीन वेबिनारमध्ये प्रधानमंत्री सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अर्थसंकल्पानंतरच्या तीन वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. अर्थसंकल्पीय घोषणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि त्यासाठीचे प्रयत्न अधोरेखित करण्यासाठी या वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. हे वेबिनार एमएसएमईच्या वाढीसाठी उपयुक्त योजना, उत्पादन, निर्यात आणि अणुऊर्जा मोहिमा तसंच गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा या विषयावर आयोजित करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या वेबीनारच्या माध्यमातून सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि व्यापार तज्ञांना भारताच्या औद्योगिक, व्यापार आणि ऊर्जा धोरणांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा