रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तामिळनाडूमधल्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या नवीन पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार आहेत. ५५० कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल उच्च दर्जाचे संरक्षक रंग आणि पूर्णपणे वेल्डेड जॉइंट्स वापरून बांधण्यात आला आहे.यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ८३०० कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. मोदी रामेश्वरम तांबरम एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील त्याचबरोबर रामेश्वरम मंदिरात जाऊन दर्शन घेतील.
Site Admin | April 6, 2025 2:50 PM | Pamban Bridge | PM Narendra Modi
प्रधानमंत्री तामिळनाडूमधल्या नव्या पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार
