काँग्रेस जाती-पातीचं राजकारण करत असल्याची टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज हरयाणात पलवल इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. काँग्रेसनं ७० वर्ष सत्तेत असूनही जनतेला रस्ते, वीज, पाणी, शौचालयं, घरं अशा मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं, जम्मू-कश्मीरमधे देशाची राज्यघटना राबवण्यात अडथळे निर्माण केले, ३७० कलम रद्द करायला आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला विरोध केला, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपानं देशापुढचे प्रश्न पूर्णपणे गांभीर्यानं सोडवले, असं मोदी म्हणाले.
हरयाणामधे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज बहादुरगढ ते कल्लूपार चौकी, आणि सोनपतमधलं हुडा मैदान ते गोहानातलं किलोहड्डी अशी संकल्प यात्रा काढली. भाजपा सरकार बड्या भांडवलदारांना मदत करत असल्याची टीका त्यांनी सोनपत इथल्या प्रचारसभेत केली. बेरोजगारी आणि अग्निवीर योजनेचा मुद्दाही त्यांनी या सभेत उपस्थित केला.