प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या स्थापना दिनी या दलातल्या शूर जवानांच्या कामगिरीला सलाम केला आहे. प्रधानमंत्र्यांनी या जवानांच्या धैर्य, समर्पण आणि निस्वार्थ सेवेचं समाज मध्यमावरच्या संदेशाद्वारे कौतुक केलं आहे. आपत्ती काळात सुरक्षेची खात्री करणं, लोकांचे जीव वाचवणं यासाठी या दलाची अतूट वचनबद्धता प्रशंसनीय आहे, असंही ते म्हणाले. आपत्ती प्रतिसाद आणि व्यवस्थापनात एनडीआरएफ नं जागतिक मानक स्थापन केल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | January 19, 2025 7:53 PM | NDRF | PM Narendra Modi