डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आरक्षण हटवेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप

काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल, असा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांची एकजूट तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. हे लोक आपापसात लढले तर काँग्रेस मजबूत होईल, असा दावा त्यांनी या सभेत केला. सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणी पेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. या विधानसभा निवडणुकीतील प्रधानमंत्र्याची ही राज्यातील शेवटची प्रचारसभा होती. यावेळी त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवारांना जिंकून देण्याचं आवाहन केलं आणि महायुती सरकारच्या शपथविधीचे आमंत्रण दिले. 

मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे आणि महायुती मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करेल असं आश्वासन मोदी यांनी दिलं. काँग्रेसच्या सरकारच्या काळात त्यांनी मुंबईच्या भविष्याचा विचार केला नाही. पण आम्ही मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहोत, असं ते म्हणाले. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या काही वर्षात मुंबईचा GDP दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे आता तशाच पद्धतीच्या योजनेचं आश्वासन देत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

येत्या ५-१० वर्षात धारावीचा माणूस तिथेच पक्क्या घरात राहील, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं. केंद्रीय मंत्री पियूष गोयल, रामदास आठवले यांच्यासह शिवसेना भाजपचे मुंबईतले उमेदवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा