महायुतीचं सरकार हवं, असा जनतेचा आवाज राज्याच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोलापूर इथं जाहीर सभेत म्हणाले. काँग्रेस आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असून विविध समाजात फूट पाडण्याचा, विविध जातींना आपापसात लढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.
महाराष्ट्राला स्थिर आणि विकासाची दृष्टी असणाऱ्या सरकारची गरज असून महायुती सत्तेत आल्यावर दूरगामी योजना आखेल असं मोदी म्हणाले.
महायुती सत्तेत आल्यावर राज्याच्या विकासाचा वेग दुप्पट होईल, असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं. ते चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमुर मतदारसंघात आयोजित प्रचारसभेला संबोधित करत होते. महायुती सरकारच्या कामगिरीची आढावा त्यांनी यावेळी घेतला. महायुतीची सत्ता आल्यावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ६ हजार रुपये हमीभाव दिला जाईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.