डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

महाराष्ट्राचा विकास हीच महायुतीची प्राथमिकता असून महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज खारघर इथं प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेल्या कामाचा आढावा घेतला. केंद्र सरकारन दहा वर्षांत २५ कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर काढलं, चार कोटी बेघर लोकांना घर दिलं, जलजीवन मिशनद्वारे बारा कोटी घरांना पाणी दिलं, बारा कोटी गरीबांच्या घरी शौचालय बनवलं असं मोदी यांनी सांगितलं.  

 

महायुती सरकारच्या काळात पनवेलमध्ये सेमिकंडक्टर क्षेत्रात गुंतवणूक झाली,  कोकणात साडे चारशे कोटींचे बंदर उभारले जात आहेत, यामुळे राज्यात लाखो रोजगार निर्माण होतील असं मोदी म्हणाले. समाजात एकोपा टिकवून ठेवायचा असेल तर महायुतीला निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं. 

 

त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रचारसभेला संबोधित केलं. महाराष्ट्राला विकसित भारताचं नेतृत्व करायचं असून त्यादृष्टीनं राज्यात अनेक अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. मराठवाड्यातला पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं काहीही केलं नाही, उलट महायुती सरकारच्या काळात सुरू केलेल्या योजना बंद पाडल्या असा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा