राज्यातल्या १० नव्या शासकीय महाविद्यालयांचं उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, बुलडाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोलीमध्ये ही महाविद्यालयं आहेत. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीसह केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांसह वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
Site Admin | October 8, 2024 8:51 PM | Maharashtra | PM Narendra Modi
राज्यातल्या १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्या प्रधानमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन
