नवी मुंबईतल्या खारघर इथं इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झालं. अध्यात्म हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. भारत समजून घेण्यासाठी आधी हे अध्यात्म आपल्या आत रुजवायला हवं, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. मानवतेची सेवा हे या अध्यात्मिक संस्कृतीचं मूळ आहे आणि याच धारणेतून केंद्र सरकारनं आयुष्मान भारत, हर घर जल, उज्ज्वला योजना इत्यादी कार्यक्रम राबवले आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं.
Site Admin | January 15, 2025 7:05 PM | ISKCON | PM Narendra Modi