विविध जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आज जग भारताकडे आशेने पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत आयोजित जीनोमिक्स डेटा कॉन्क्लेव्हला व्हीडीओ संदेशाद्वारे संबोधित करत होते. जीनोम इंडिया प्रकल्प हा देशाच्या जैवतंत्रज्ञान विषयातला एक निर्णायक प्रकल्प असल्याचं ते म्हणाले. जैवअर्थव्यवस्था शाश्वत विकासाला गती देते आणि गेल्या १० वर्षांत देशाच्या जैवअर्थव्यवस्थेत लक्षणीय वाढ झाली आहे. २०१४ मध्ये देशाची जैवअर्थव्यवस्था १० अब्ज डॉलर्स इतकी होती, ती गेल्या आता दीडशे अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे, अशी माहिती मोदी यांनी यावेळी दिली. भारतात कोट्यवधी लोकांना मोफत उपचार दिले जातात आणि आरोग्याच्या चांगल्या पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत, असंही ते म्हणाले.
Site Admin | January 9, 2025 7:59 PM | PM Narendra Modi