डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य’ संकल्पना अद्यापही समर्पक – प्रधानमंत्री

नवी दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या जी-20 शिखर परिषदेची एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य ही संकल्पना अद्यापही समर्पक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ब्राझिलच्या रीओ दी जेनेरो शहरांत सुरु असलेल्या जी-20 देशांच्या शिखरपरिषदेत ते काल बोलत होते. सामाजिक समरसता तसंच भूक आणि गरिबी निर्मुलन याविषयावर आयोजित चर्चासत्रांत ते बोलत होते. भारताच्या अधयक्षपदाच्या कार्यकाळांत सुरु झालेली मानवकेंद्रित निर्णयांची परंपरा ब्राझिलच्या अध्यक्षतेखालील कार्यप्रणालीतही सुरु असल्याचं ते म्हणाले. जी-20 गटानं महिला नेतृत्व आणि युवकांना केंद्रस्थानी ठेऊन सर्वसमावेशक विकासाला प्राथमिकता दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं.

 

जागतिक स्तरावरील अनिश्चिततेचा परिणाम दक्षिणेकडील देशांत अन्न, इंधन आणि खतं या क्षेत्रावर होत असून या मुद्यांना प्राथमिकता दिल्याखेरीज शिखर बैठकीतील चर्चा य़शस्वी होणार नाहीत याकडे पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांचं लक्ष वेधलं. गरिबी विरुद्ध जागतिक आघाडी सुरू केल्याबद्दल ब्राझीलच्या G20 अध्यक्षांच्या पुढाकाराचं समाज माध्यमावरील संदेशांत मोदींनी कौतुक केलं आहे. या प्रयत्नांना भारताच्या पूर्ण पाठिंब्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिटन, इटली, फ्रांस, नॉर्वे, पोर्तुगल आणि इंडोनेशियाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. या देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मोदी यांची त्यांचे ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्याशीही चर्चा झाली. येत्या काही वर्षात भारत आणि ब्रिटन हरित ऊर्जा, संरक्षण आणि नवीन तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात एकत्रित काम करण्यास उत्सुक आहेत. दोन्ही देश व्यापार तसंच सांस्कृतिक संबंध वृध्दींगत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मोदींनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा