सबका साथ सबका विश्वास या मंत्रानं देशात विचारधारा आणि प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल केला असून गरीब, आदिवासी, दलित, वंचित, मागासवर्गीय, महिला, युवावर्ग आणि शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आपल्या झारखंड दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज ६ वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्य्रक्रमात प्रधानमंत्र्यांनी ६६० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पणही केलं.
केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांअंतर्गत बांधलेल्या देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा प्रारंभ आणि ४६ हजार लाभार्थ्यांच्या गृहप्रवेशही सोहळाही या कार्यक्रमात झाला. प्रधान मंत्री आवास योजना- ग्रामीणच्या २० हजार लाभार्थ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आवास मंजुरी पत्रांचं वाटपही करण्यात आलं.
प्रधानमंत्री उद्या अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या अहमदाबाद ते गांधीनगर गाडीला हिरवा झेंडा दाखवतील. ते गांधीनगरमधे चौथ्या पुनर्नविकरणीय उर्जा परिषदेचं उद्घाटन करतील, तसंच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. अहमदाबादमधे ८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांचा प्रारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.