प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारपासून आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री आज गुवाहाटीतील झुमोईर बिनदिनी कार्यक्रमात सहभागी होतील. उद्या त्यांच्या हस्ते ‘अॅडव्हान्टेज आसाम २.० या गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा परिषदेचं उद्घाटन होणार आहे. गुवाहाटीत दाखल झाल्यानंतर प्रधानमंत्री आज संध्याकाळी सरुजाई स्टेडियममध्ये भव्य झुमुर नृत्य सादरीकरणाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. ८,५०० हून अधिक चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारे मजूर वर्गातील कलाकार हे झुमुर नृत्य सादर करणार आहेत.
Site Admin | February 24, 2025 9:10 AM | Assam | PM Narendra Modi
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर
