आम आदमी पक्ष दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यात अपयशी ठरला असून दिल्लीत मद्य उपलब्ध आहे पण पिण्यासाठी पाणी नाही. अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी आम आदमी पार्टीवर हल्लाबोल केला आहे. ते आज भाजपाच्या बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांबरोबर नमो एप वरुन संवाद साधताना बोलत होते. आप आणि काँग्रेस लोकांची दिशाभूल करत असून केजरीवाल यांनी त्यांच्या घरावर मोठा खर्च केला, मात्र आयुष्यमान योजना स्विकारली नाही. याकडे लक्ष वेधतानाच त्यांनी यमुना नदीचं प्रदूषण दूर करण्याचं आश्वासन आप ने दिलं पण ते पूर्ण केलं नाही, यावरुन जोरदार टीका केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी सदर बाजार इथल्या इंद्रलोक वसाहतीत जाहीर सभा घेतली. आप चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या. भाजपाला सत्ता दिल्यास ते सर्व सवलती रद्द करतील, असं ते यावेळी म्हणाले. आपचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीत रोड शो केला.