प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या, आरोग्य क्षेत्राशी निगडीत 12 हजार 850 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य विम्याची व्याप्ती 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढवली जाणार आहे. तसंच अखिल भारतीय आयुर्वेदीक संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचंही उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ज्यात पंचकर्मा रुग्णालयाचाही समावेश आहे. त्याच बरोबर मध्य प्रदेशातल्या मंदसौर, नीमुच आणि सेवनी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्घाटनाचा यात समावेश आहे. तसंच काही राज्यातल्या एम्स रुग्णालयांचं विस्तारीकरणही त्यांच्या हस्ते होणार आहे.
Site Admin | October 28, 2024 8:01 PM | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी