राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीए देशाच्या प्रगतीसाठी आणि गरिबांच्या सशक्तीकरणासाठी वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. चंडीगढ इथं एनडीएच्या प्रणित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत सुशासन आणि नागरिकांना अधिक सेवासुविधा पुरवत त्यांचं राहणीमान अधिक चांगलं कसं करता येईल, यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवरून दिली.या बैठकीत भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. याच बैठकीत संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यावरही चर्चा झाली. या बैठकीला १७ राज्यांचे मुख्यमंत्री आणि १८ उपमुख्यमंत्री उपस्थित होते.