डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासाकरता तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासाकरता तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

 

अमेरीका दौऱ्यात न्यूयार्कमध्ये अमेरीकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रामधल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांची गोलमेज परिषद प्रधानमंत्री मोदी यांनी घेतली. तिथे ते बोलत होते. कृत्रिम बुद्धीमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यावर या परिषदेने भर दिला. भारतासह जगभरात सगळीकडे नवनव्या तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर आणि त्यातून सामान्यांना होणारा लाभ याबद्दल परिषदेत चर्चा झाली. तंत्रज्ञान आणि लोकशाही यांचं एकत्रीकरण म्हणजे मानवी कल्याणाची हमी आहे, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. विविध क्षेत्रातील  द्विपक्षीय सहभागाबद्दल मोदी यांनी यावेळी चर्चा केली. 

 

अमेरिकेतला भारतीय समुदाय म्हणजे भारताचे सदिच्छा दूत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. न्यूयॉर्कमधील लाँग आयलंड इथं भारतीय समुदायातर्फे आयोजित कार्यक्रमात सांगितलं. 

 

भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये अनिवासी भारतीय समुदायानं बजावलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं. जगासाठी एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलेजिन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असा अर्थ आहे, पण आपण एआय म्हणजे अमेरिकन-इंडियन स्पिरिट म्हणजे अमेरिकी भारतीयांची वृत्ती असं मानतो असं ते म्हणाले. अमेरिकेतल्या भारतीयांनी अमेरिकेला भारतीयांशी जोडलं आहे आणि त्यांचं कौशल्य आणि बुद्धिमत्ता अतुलनीय आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

बोस्टन आणि लॉसएंजलिस इथं दोन भारतीय दूतावास सुरू केले जातील, अशी घोषणा प्रधानमंत्र्यांनी या वेळी  केली. भारताचे सध्या न्यूयॉर्क, अटलांटा, शिकागो, ह्युस्टन, सॅन फ्रान्सिस्को आणि सिऍटल इथं दूतावास आहेत. ह्युस्टन विद्यापीठात थिरुवल्लूर तमीळ भाषा अध्यासन सुरू करत असल्याचीही घोषणा केली. 

 

भारतात जगभरातील भाषा, धर्म आणि पंथांचे लोक राहतात, पण तरीही देशात एकात्मता नांदते, असं मोदी म्हणाले. भारतीय संस्कृतीमध्येच वैविध्य समजून घेणं, ते जगणं आणि त्याचा दैनंदिन आयुष्यात समावेश करणं या गोष्टी समाविष्ट असल्याचं निरीक्षण त्यांनी मांडलं.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा