जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सभा घेणार आहेत. जम्मू कश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भाजपच्या रॅलीला ते संबोधित करतील. या भागातल्या तीन जिल्ह्यांत १८ सप्टेंबर रोजी मतदान होईल. प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या भागात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त आहे. या नंतर १९ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री श्रीनगरला भेट देतील.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्याची घोषणा आज पक्षाचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी यांनी वार्ताहर परिषदेत केली. या जाहीरनाम्यात मुगल रोडचं नामांतर, जम्मू तसंच श्रीनगर विमानतळाचं नामकरण तसंच, कटरा इथे डोगरा संग्रहालय अशा आश्वासनांचा समावेश आहे.