डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 14, 2025 9:49 AM | PM Narendra Modi

printer

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते हरियाणातल्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरियाणामधल्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. प्रधानमंत्री हिसार ते अयोध्या या व्यावसायिक विमान उड्डाणा सेवेला हिरवा झेंडा दाखवतील आणि हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. तर यमुनानगरमध्ये, 800 मेगावॅट वीज युनिट क्षमतेच्या दीनबंधू छोटू राम औष्णिक वीज प्रकल्पाचं, तसंच मुकरबपूरमधला कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प आणि भारतमाला प्रकल्पांतर्गत 14 किमीपेक्षा जास्त लांबीच्या रेवाडी बायपास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा