डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री थायलंडमधल्या बँकॉक इथे पोहोचले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडमधल्या बँकॉक इथे पोहोचले. विमानतळावर थायलंडचे उपप्रधानमंत्री सूर्या जुआनग्रुआंकित यांनी मोदी यांचं स्वागत केलं. थायलंडमधला भारतीय समुदायही प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं आला होता. त्यानंतर मोदी यांच्या स्वागतार्थ भरतनाट्यम आणि थायलंडच्या शास्त्रीय नृत्यशैलीचा मिलाफ दाखवणारा कार्यक्रम सादर करण्यात आला.  

 

या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी थायलंडच्या प्रधानमंत्री पेतोंगटार्न शिनावात्रा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करून दोन्ही देशांमधल्या संबंधांचा आढावा घेतील. या दरम्यान ते द्विपक्षीय करारांवरही स्वाक्षरी करतील. सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेसाठी ते उद्या उपस्थित राहणार आहेत. या शिखर परिषदेत अनेक करार आणि घोषणा होण्याची शक्यता आहे. ही परिषद आटोपून मोदी उद्या तीन दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा