प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३० तारखेला महाराष्ट्र आणि छत्तीसगढला भेट देणार आहेत. नागपूरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने ते स्मृतिमंदिर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील. ते दीक्षाभूमीला भेट देतील. त्यानंतर ते माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन करतील आणि एका कार्यक्रमाला संबोधित करतील. याशिवाय इतरही प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री छत्तीसगढला जातील. बिलासपूर इथं ३३ हजार ७०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.
Site Admin | March 28, 2025 6:10 PM | PM Narendra Modi
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० मार्चला महाराष्ट्र आणि छत्तीसगढ दौऱ्यावर
