डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 12, 2025 8:03 PM | PM Narendra Modi

printer

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोखूल यांनी त्यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन’ या कार्यक्रमात प्रदान केला. भारत – मॉरिशस संबंधात भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलं. हा सन्मान मिळवणारे प्रधानमंत्री मोदी हे पहिले भारतीय आहेत.

 

मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन रामगुलाम यांच्यासोबत त्यांनी आज प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली. यावेळी स्थानिक चलनात देवाण घेवाण, कर्ज पुरवठा, राजदुतांसाठी प्रशिक्षण, बंदरातल्या व्यवसायाच्या माहितीची देवाणघेवाण, आर्थिक गुन्हे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात सहकार्य, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण यासारख्या विषयांवर ८ सामंजस्य करार दोन्ही देशात झाले. 

 

ग्लोबल साउथसाठी MAHASAGAR अर्थात Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions या उपक्रमाची घोषणा त्यांनी यावेळी केली. या अंतर्गत विकासासाठी व्यापार, शाश्वत वृद्धीसाठी क्षमता विकास, परस्पर सुरक्षा यावर भर दिला जाणार आहे. हा दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी रवाना झाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा