प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मंगळवारपासून दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर जाणार आहेत. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री तिथल्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये सिव्हिल सर्व्हिस कॉलेज आणि विभागीय आरोग्य केंद्राचा समावेश आहे. हे प्रकल्प भारताच्या मदतीनं उभारण्यात आले आहेत.
भारत आणि मॉरिशस यांच्यात मजबूत, गतिशील आणि द्विपक्षीय संबंध आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील हे मजबूत संबंध अधिक दृढ होतील आणि हे संबंध नव्या उंचीवर नेण्यास मदत होईल, असं मॉरिशसमधील भारताचे उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव यांनी आकाशवाणीला सांगितलं.