प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुखवा इथं ते गंगा मातेचं दर्शन घेतील आणि पूजा करणार आहेत. त्यानंतर हर्सिल इथं ट्रेक आणि बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून उपस्थितांना संबोधित करणार आहेत. उत्तराखंड सरकारनं यंदा हिवाळी पर्यटन कार्यक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत हजारो भाविकांनी या हिवाळ्यात चारधाम यात्रा केली. धार्मिक पर्यटनाला चालना देऊन स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
Site Admin | March 5, 2025 1:24 PM | PM Narendra Modi
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर
