डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कृषी अर्थतज्ज्ञांच्या ३२व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत परदेशी प्रतिनिधींकडून भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषीक्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा

नवी दिल्ली इथं आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या ३२व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित असलेल्या परदेशी प्रतिनिधींनी भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषीक्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा केली आहे. या सहा दिवसीय परिषदेला ७५ देशांमधले कृषी अर्थतज्ञ उपस्थित असून त्यांनी  भारताच्या कृषिक्षेत्रातल्या कामगिरीचं आणि संशोधनाचं कौतुक केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल या परिषदेचं उद्घाटन झालं. भारत अनेक कृषी उत्पादनांमधला अग्रणी उत्पादक आहे, भारताची वैविध्यपूर्ण जैवसंस्था आणि कृषी शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा यांनी कृषी क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीमध्ये महत्वाचं योगदान दिलं आहे, असं बांगलादेशच्या प्रतिनिधींनी म्हटलं आहे. तर भारत कृषिक्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत असून त्यादृष्टीनं होणारं संशोधन उल्लेखनीय आहे, असं केनियानं म्हटलं आहे. शेतीमधल्या पारंपारिक पद्धती  आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी भारत आणि इतर देशांमध्ये असलेलं सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचं मत जपानच्या प्रतिनिधीनं व्यक्त केलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा