प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून पुढचे तीन दिवस मध्यप्रदेश, बिहार आणि आसाम या राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते आज दुपारी मध्यप्रदेशच्या छत्रपूर जिल्ह्यात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी केली जाणार आहे. या कर्करोग रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रं आणि निष्णात डॉक्टरांकडून वंचित वर्गातील कॅन्सर रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. प्रधानमंत्री भोपाळ इथं दोन दिवसीय जागतिक गुंतवणूकदार परिषदेचंही उद्घाटन करणार आहेत.
Site Admin | February 23, 2025 1:35 PM | PM Narendra Modi
प्रधानमंत्री आजपासून पुढील तीन दिवस मध्यप्रदेश, बिहार आणि आसामच्या दौऱ्यावर
