भारत केवळ भविष्याबद्दलच्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी नसून या चर्चांचं नेतृत्वही करत आहे; असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत एका शिखर परिषदेला संबोधित करताना म्हणाले, जागतिक स्तरावर भारताला पूर्वी कधीही मिळालं नव्हतं असं स्थान मिळालं आहे. प्रमुख राष्ट्र किंवा जागतिक व्यासपीठाचा भारतावरील विश्वास पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाला आहे. भारत पहिल्या तीन औद्योगिक क्रांती चुकला परंतु चौथ्या वर्षात जगासोबत पुढे जाण्याकरता भारत तयार आहे. येत्या काळात भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.
Site Admin | February 16, 2025 8:58 AM | PM Narendra Modi
‘भारत’ जागतिक चर्चांचं नेतृत्व करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
