फ्रान्सच्या यशस्वी भेटीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज पहाटे वॉशिंग्टन इथं पोहोचले. अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. राष्ट्राध्यक्षांचं अतिथीगृह असलेल्या ब्लेअर हाऊस इथं पोहोचल्यावर भारतीय समुदायानं त्यांचं स्वागत केलं.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबार्ड यांनी आज वॉशिंग्टन डीसी इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी द्विपक्षीय गुप्तचर सहकार्य, विशेषतः दशतवादविरोधी कारवाया, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख धोके आणि धोरणात्मक गुप्तचर माहितीचं आदान-प्रदान या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली.
भारत आणि अमेरिकेचे नागरिक परस्पर हितासाठी आणि पृथ्वीच्या चांगल्या भविष्यासाठी एकत्र येऊन काम करतील असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे.