अजमेर इथल्या सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्यावर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाठवलेली चद्दर अर्पण करण्यात आली. अजरमेर इथं ८१३ वा उर्स सुरू झाला आहे. हे औचित्य साधत केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरण रिजीजू यांनी प्रधानमंत्र्यांच्या वतीनं दर्ग्यात चद्दर अर्पण केली. ख्वाजा यांचे कल्याणकारी विचारांचा संपूर्ण विश्वावर प्रभाव आहे. सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांनी लोकांमध्ये सद् भाव आणि प्रेम पसरवला, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
किरण रिजीजू यांच्या हस्ते दर्ग्याच्या संकेतस्थळाचं आणि गरीब नवाज या ॲपचं उद्घाटन झालं. दर्ग्याच्या संकेतस्थळावरून तिथं होणाऱ्या कार्यक्रमांचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. तर गरीब नवाज मोबाईल ॲपच्या माध्यमातून भाविकांना राहण्यासाठी नोंदणी करता येईल. तसंच दर्ग्यात दान करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिली आहे.