प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंग यांच्या दोन लहान मुलांच्या साहेबजादे बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंग यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, लहान वयातही ते आपल्या तत्वाशी आणि आस्थेबरोबर एकनिष्ठ राहिले. त्यांचं बलिदान निष्ठा आणि वीरतेचं प्रतीक आहे.
या बाल वीरांच्या स्मृतीला देशात सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहेबजादे यांच्या प्रतिमेला फुलं अर्पण करून अभिवादन केलं.