प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २५ नोव्हेंबर रोजी जागतिक सहकार संघटनेच्या आंतराष्ट्रीय संमेलनाचं नवी दिल्ली इथे उद्घाटन होणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त एका टपाल तिकीटाचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुतानी आणि इफ्को लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू. एस. अवस्थी यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. गेल्या १३० वर्षांत प्रथमच आयसीए अर्थात आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीच्या बैठकीचं तसंच या संमेलनाचं आयोजन भारतात होत आहे. २५ नोव्हेंबर रोजी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे या संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत.
या संमेलनात भारताच्या प्रतिनिधी म्हणून डॉ. वर्षा कस्तुरकर या सहभागी होणार असून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला या संमेलनाचा मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.