प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देश विदेशात भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या इ-लिलावाची तारीख आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी हा लिलाव १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होणार होता. प्रधानमंत्र्यांना मिळालेल्या भेट वस्तूंच्या लिलावाची ही ६वी आवृत्ती असून यातून मिळणारं धन नमामि गंगे प्रकल्पासाठी वापरलं जाणार असल्यामुळे नागरिकांनी मोठया संख्येनं लिलावात बोली लावून या कार्यात योगदान द्यावं, असं आवाहन सरकारनं केलं आहे. उत्कृष्ट कलाकृती, मंदिरांच्या प्रतिकृती, हिंदू देवतांच्या मूर्ती आणि पॅरालिम्पिक खेळाडूंचे बूट अश्या विविध प्रकारच्या सुमारे सहाशे वस्तू यावर्षी लिलावात मांडण्यात आल्या आहेत.
Site Admin | October 3, 2024 1:27 PM | PM Narendra Modi