आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रविचंद्रन अश्विन यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. क्रिकेट आणि देशासाठी अश्विन यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतलेले ७६५ बळी आणि कसोटीत सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार या अश्विन यांच्या विक्रमावर प्रकाश टाकताना, मोदींनी त्यांच्या गोलंदाजीतील विविधता आणि प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवण्याच्या क्षमतेचे कौतुक केले. प्रधानमंत्री मोदींनी आपल्या पत्रात अश्विनच्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या क्षणांचा उल्लेख केला. अश्विनच्या क्रिकेट कारकिर्द भविष्यातल्या पिढ्यांना प्रेरणा देईल अशी आशा व्यक्त केली.
Site Admin | December 22, 2024 1:54 PM | PM Narendra Modi | ravichandran ashwin