पीएम गतीशक्ती बृहद् आराखडा सर्व क्षेत्रात वापरला जात आहे यामुळे विकसित भारत उपक्रमाला नवीन गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं असलेल्या पीएम गतीशक्ति अनुभूती केंद्राला मोदी यांनी काल भेट दिली. पीएम गतीशक्तीची मुख्य वैशिष्ट्ये, यश आणि मुख्य टप्पे या अनुभूती केंद्रात दर्शवले आहेत.
पीएम गतीशक्ती बृहद् आराखड्याला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या उपक्रमामुळे देशभरातील प्रकल्पांचे वेगवान नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये झालेल्या प्रगतीची त्यांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ओ डी ओ पी अनुभूति केंद्रालाही भेट दिली आणि विविध जिल्ह्यांत उत्पादित होणाऱ्या उत्पादनांची निवड, त्यांचं ब्रँडिंग आणि जाहिरातीत मदत करण्यासाठी ओ डी ओ पी उपक्रमाने केलेल्या प्रगत वाटचालीचं त्यांनी कौतुक केलं.