प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं जिल्हास्तरीय न्यायपालिकेसंबंधीच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्षं झाल्याच्या निमित्ताने एक विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या या परिषदेत जिल्हास्तरीय न्यायपालिकेसमोरच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी पाच सत्रं होणार आहेत. सरन्यायाधीश, केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री आणि ॲटर्नी जनरल या परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
Site Admin | August 31, 2024 10:26 AM | PM Narendra Modi