प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. दिसानायके आणि त्यांच्याबरोबरच्या मान्यवरांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. अनुरा कुमारा दिसानायके तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज संध्याकाळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनघड यांची भेट घेणार आहेत. तसंच बिहारमधल्या बौद्ध गया इथंही ते भेट देतील. दोन्ही देशांमधले संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं.
Site Admin | December 16, 2024 1:26 PM | India | PM Narendra Modi | Shrilanka